गेवराई मध्ये रेशीम फाईल मंजूर करण्यासाठी लाच मागणारा राठोड अधिकारी पकडला
Reshim udyog ( construction industry):गेवराई तालुक्यातील रेशीम उद्योग फाईल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे घेऊन शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम सबंधित अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. याला वैतागून एका शेतकऱ्याने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून राठोड नावाचा अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडुन दिला आहे.
गेवराई तालुक्यातील देवपिंप्री येथील शेतकरी दादासाहेब गवारे यांना रेशीम उद्योग करायचा होता त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान मिळते ते अनुदान मिळनेसाठी फाईल तयार करायची होती. सदर योजनेची फाईल मंजूर करण्यासाठी शेतकरी तालुक्याच्या रेशीम उद्योग विभागाचे संदीप राठोड यांना भेटले असता या अधिकाऱ्याने मुद्दाम काही त्रुटी आहेत सांगून सदर शेतकऱ्याला प्रती फाईल मागे 10500 रुपये देण्याची मागणी केली.पैसे दिले तरच तुझी फाईल पुटअप करेल नसता करणार नाही असे अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यास सांगण्यात आले. सदर इंजिनियर राठोड मुद्दाम पैसे मागत असल्याने आणि पैसे द्यायची इच्छा नसल्याने सबंधित शेतकऱ्याने संभाजी नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक पाटील मॅडम यांच्याकडे फोन करून तक्रार दाखल केली . त्यानुसार दिनांक 26/07/2024 रोजी सापळा लावून 10,000 देताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर प्रकरणातील रक्कम माऊली गॅरेज गेवराई येथे ठेवण्याचे सबंधित अधिकाऱ्याने सांगितले म्हणून गॅरेज चालकावर सुद्धा कारवाई करण्यात आली असून सदर घटनेबाबत रेशीम अधिकारी संदीप राठोड आणि गॅरेज चालक चंद्रकांत शेळके यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 नुसार व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 अ नुसार गेवराई पोलिस स्टेशन येथे फिर्याद क्रमांक 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक सविस्तर माहिती साठी सबंधित प्रकरणातील एफ आय आर प्रत वाचून माहिती घेऊ शकता.Anti curruption trap Georai