अंगणवाडी सेविका भरती सुरू , लवकरात लवकर अर्ज करा

अंगणवाडी सेविका भरती सुरू , लवकरात लवकर अर्ज करा

 

एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पंचायत समिती येथे उमेदवाराने स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करायचा आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक महिला उमेदवार ही किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे.

 

एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प गेवराई येथे अंगणवाडी महिला मदतनीस पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून यासाठी उमेदवार किमान 12 पास असणे आवश्यक आहे. अर्ज सोबत 12 चे गुणपत्रक जोडणे अनिवार्य आहे. सोबत mscit कॉम्पुटर कोर्स झालेला असेल तर त्याचे प्रमाणपत्र आणि पदवी शिक्षण झाले असेल तर त्याचे प्रमाणपत्र जोडावे. उमेदवाराचे रहिवाशी प्रमाणपत्र – ग्रामसेवकांची स्वाक्षरी असलेले, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10 वी सनद झेरॉक्स, 12 पास चे गुणपत्रक झेरॉक्स, जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स, अंगणवाडी मदतनीस अनुभव असल्यास त्याचे अनुभव प्रमाणपत्र, अनाथ मुलगी किंवा विधवा पत्नी असेल तर त्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्स आदी प्रमाणपत्र आवश्यक आहेत. एकदा अर्ज दखल केल्या नंतर पुन्हा कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे अर्ज करतानाच व्यवस्थित काळजी घ्यावी.

गेवराई तालुका बीड जिल्ह्याचे अनेक गावांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून अधिक माहिती साठी पंचायत समिती गेवराई येथे समक्ष जाऊन अधिकची माहिती घ्यावी. आमच्या माहिती प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे मात्र यात काही बदल झाल्यास आम्ही काही हमी देत नाही त्यामुळे आपण आपल्या इच्छेनुसार आणि जिम्मेदारीवर अर्ज करावा आम्ही केवळ माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment