या विद्यार्थ्यांना मिळते मोफत टॅब लॅपटॉप आणि इंटरनेट सुविधा
JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील mahajyoti tab registration 2024
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.
योजनेच्या लाभासाठी पात्रता :-
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी.
3. सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल.
6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
7. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.
अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :-
1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
5. 10 वी ची गुणपत्रिका
6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)
7. दिव्यांग असल्यास दाखला
8. अनाथ असल्यास दाखला
वरील कागदपत्रांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.