anti corruption bureau beed: बीड चे मंडळ अधिकारी एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले
यशस्वी सापळा कारवाई अहवाल
दि.21/08/2024
▶️ युनिट- बीड
▶️ तक्रारदार- पुरुष ,वय- 31वर्ष,
▶️ आरोपी -सचिन भागवत सानप,
वय 39 वर्ष , मंडळ अधिकारी , बीडशहर
(वर्ग ३ ) , रा . MSG अपार्टमेंट , फ्लॅट क्रमांक ४ , जुना नगर नाका बीड ,
➡️लाच मागणी दिनांक – 21/08/2024
▶️ लाच मागणी : 2,00000 रुपये तडजोड अंती 1,50,0000 रुपये
➡️ लाच स्विकारली दि – 21 / 08/2024
➡️ लाच स्विकारली – 1,00,000 रुपये
▶️ ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालया समोर , नगर रोड , बीड
▶️ कारण – यातील तक्रारदार यांचे नातेवाईक व ईतरा विरुद्ध पोलीस स्टेशन पिंपळणेर येथे मुरुम उत्खनन संदर्भात गुरन २०६/२४ दाखल असुन नमुद गुन्हयासंदर्भाने
यातील लोकसेवक मंडळ अधिकारी श्री सचिन सानप यांनी बीड तरफ खोड सज्जा अंतर्गत मोची पिंपळगाव येथील गट क्रमांक ४९ मधील मुरुम उत्खनन जागेचा पंचनामा केला होता . नमुद पंचनाम्यात १००० ब्रास ऐवजी ५०० ब्रास उत्खनन दाखवून तक्रारदार यांना लाभ मिळवून देण्यासाठी लोकसेवक सचिन सानप यांनी पंचा समक्ष 2,000,00 रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती 1,50,000रुपये स्विकारण्याचे मान्य केले . व पहीला हप्ता 100000 रुपये आजच स्विकारण्याचे मान्य केले . त्यावरुन आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर , जुना नगर नाका बीड येथे सापळा कारवाई केली असता लोकसेवक सचिन सानप यांना तक्रारदार यांचे कडुन 100,000 रुपये लाच रक्कम स्विकारताच त्यांना लाच रकमेसह रंगे हात पकडण्यात आले आहे. लोक सेवक सचिन सानप यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे .
▶️ सापळा अधिकारी –
शंकर शिंदे ,पोलीस उप अधिक्षक ,बीड
मो.9355100100
▶️मार्गदर्शक- श्री संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.
9923023361
श्री. मुकुंद आघाव अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर
➡️सह सापळा अधिकारी
श्री युनुस शेख पोलिस निरीक्षक ला.प्र.वि.बीड
मो. +91 97650 00784
➡️सापळा पथक : सुरेश सांगळे,श्रीराम गिराम , भरत गारदे , अमोल खरसाडे, हनुमान गोरे , संतोष राठोड , अविनाश गवळी , सुदर्शन निकाळजे , अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि.बीड
#बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064
*मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजी नगर :-*9923023361* संपर्क साधावा. ला. प्र. वि.बीड दूरध्वनी क्रमांक (02442-222649)