Ealpsankhyank-mulinche-vastigruh-bharti: अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृहातील कंत्राटी पदांच्या पदभरतीबाबत.
अल्पसंख्याक विभागाद्वारे संचालीत शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृहातील कंत्राटी पदांकरीता अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने ११ महिने मुदतीकरीता खालील पदे भरावयाची आहेत. त्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदाकरीता आवेदन करण्याकरीताचा अर्ज व शैक्षणिक पात्रता तसेच अटी व शर्ती याबाबत संपुर्ण माहिती https://amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी नमूद संकेतस्थळावरुन अर्जाचा नमूना प्राप्त करुन घ्यावा व शैक्षणिक पात्रतेच्या व अनुभवाच्या आवश्यक कागदपत्रासह सदर अर्ज दिनांक २५/०९/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये अल्पसंख्याक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करावा. तसेच दिनांक २५/०९/२०२४ नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथील अल्पसंख्याक समाजातील मुलींकरीता बांधण्यात आलेल्या वसतीगृहाच्या व्यवस्थापनाकरीता मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात ११ महिने मुदतीकरीता कंत्राटी पध्दतीने पदभरती बाबत.
अटी व शर्ती.
१. उमेदवार महाराष्ट्राचे व अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. (तसेच अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.)
२. उमेदवारांचे किमान वयोमर्यादा वय वर्ष २१ ते ४५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
३. सदर पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात एकवित मानधनावर कत्रांटी पध्दतीने असल्यामुळे सेवा नियमित करण्याची कोणतीही मागणी करता येणार नाही किंवा ती अनुज्ञेय राहणार नाही. तसेच नियुक्तीचा कालावधी निश्चीत करण्याचे अधिकार निम्न स्वाक्षरीतांकडे राहतील.
४. सदर पदाकरीता आवेदन करण्याकरीताचा अर्जाचा नमूना https://amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
५. अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या व अनुभव प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित करुन जोडणे आवश्यक आहेत. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मुळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील.
६. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार मानधन देण्यात येईल.
७. निवड झालेल्या उमेदवारांस रु. १००/- च्या स्टॅम्पपेपरवर (बॉडवर) सेवेबाबत करारनामा करुन देणे बंधनकारक राहील.
८. नियुक्त उमेदवारांकडून वसतीगृह व वसतीगृह परिसरातील बांधकाम / वस्तुंचे आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास ते त्यांचेकडून वसूल करण्यात येईल. तसेच गुन्ह्याचे स्वरुप पाहून बेळेनुसार नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
९. नियुक्तीचे कालावधी मध्ये अधिक्षक महिला यांनी बसतीगृहामध्ये कायमस्वरुपी वास्तव्य करणे अनिवार्य राहील.
१०. काम करतांना कुठल्याही प्रकारची अनपेक्षित घटना / अपघात इ. कारणामुळे शारिरीक इजा झाल्यास त्यास उमेदवार स्वता जबाबदार राहील. त्याबाबत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जाणार नाही.
११. नियुक्त उमेदवारांस स्वताचे इच्छेनुसार सेवामुक्त / राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांनी १ (एक) महिना अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयास व संबंधित शैक्षणिक संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. अशी नोटीस न दिल्यास सेवा सोडून गेल्यास एक महीन्याचे मानधन वसूल करण्यात येईल. परंतू संबंधिताना कोणत्याही वेळी कोणतेही कारण न दर्शविता काढून टाकण्याचा किंवा सेवा कालावधी कमी करण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीतांकडे राहील.
१२. उमेदवारांनी अर्जावर स्वताचा सद्यकाळातला फोटो लावावा, तसेच उमेदवारांनी अर्जामध्ये पद स्पष्टपणे नमूद करावे.
१३. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५/०९/२०२४ असून उमेदवारांनी सदर अर्ज अंतिम दिनांकाच्या आतच करणे आवश्यक आहे. अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
१४. प्राप्त अजाँची छाननी करुन पात्र उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी येण्या-जाण्याचा तसेच इतर खर्च स्वताच भागवावा लागेल. तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही. किंवा अपात्रतेचे कारण कळविले जाणार नाही. किंवा यासंदर्भात कोणतीही सबब ऐकुण घेतली जाणार नाही.
१५. उमेदवारांना अर्जाच्या छाननीअंती मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या https://amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल, १६. जर मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास वेळ प्रसंगी लेखी परिक्षा व मुलाखात घेतली जाईल, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीतांकडे आहे.
१७. नियुक्त उमेदवारांना उपरोक्त मानधनाव्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते, सवलती अनुज्ञेय असणार नाहीत.
१८. उमेदवार हा स्थानिक जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
१९. उमेदवारांचे कर्तव्यस्थान है अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह असुन त्यांना देण्यात येणा-या नियुक्ती आदेशानुसार काम करावे लागेल, उमेदवारांना कर्तव्यस्थान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नेमूण देण्यात येईल.
२०. उमेदवारांना तोंडी मुलाखतीकरीता मुलाखतीच्या तारखेस येतेवेळी आपले मुळ प्रमाणपत्र / कागदपत्रांसह १ तास अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात, अमरावती येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
२१. उमेदवारांना निकालासंबंधी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
२२. चौकीदार/सुरक्षा रक्षक व्यतीरीक्त इतर सर्व पदे फक्त स्त्री उमेदवारांसाठी आहेत.
२३. सदर नियुक्ती ही नियुक्ती तारखेपासुन ११ महिने कालावधी करीता राहील.
२४. कर्तव्याबर असताना कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक आढळल्यास कोणतीही सुचना न देता सेवेतून कमी करण्याचा संपूर्ण अधिकार निम्न स्वाक्षरीतांकडे आहे.
२५. अधिक्षक (महिला) या पदाकरीता शैक्षणिक पात्रता व अनुभव तसेच मुलाखतीद्वारे अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
२६. लिपिक टंकलेखक (महिला) या पदाकरीता शैक्षणिक पात्रता, अनुभव, मुलाखत व संगणकावर मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. अश्याप्रकारे परीक्षा घेऊन अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
२७. शिपाई (महिला) या पदाकरीता शैक्षणिक पात्रता, अनुभव, मुलाखतीद्वारे अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
२८. सफाई कामगार महिला या पदाकरीता अनुभव व मुलाखतीद्वारे अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
२९. सुरक्षा रक्षक / चौकीदार या पदाकरीता शारिरीक प्रकृती, उंची, बौध्दीक ज्ञान, शैक्षणिक पात्रता,
अनुभव, मुलाखतीद्वारे अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
३०. तसेच कंत्राटी कर्मचारी यांचे पदभरती बाबत तसेच निवड व नियुक्ती बाबत वेळेप्रसंगी कोणतेही बदल करण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी अमरावती यांचा राहील.