Application for tadi shop: ताडी दुकान लिलाव अर्ज प्रकिया सुरू, लवकरच अर्ज करा

Application for tadi shop: ताडी दुकान सुरू करा, लवकरच अर्ज सुरू होणार

महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि झाडांना पाडणे नियम १९६८ व महाराष्ट्र ताडी दुकान (लिलाव नि-निविदेव्दारे अनुज्ञप्ती देणे) सर्व लोकांना कळविण्यात येते की, ताडी दुकानांबाबत (जाहिर ई-लिलाव नि-निविदाव्दारे) अनुज्ञप्ती मंजूर करण्याचे महाराष्ट्र शासन निर्णय, गृहविभाग क्रमांक टिओडी ०६२१/प्र.क्र.८९/राऊशु-३, दि.३० ऑगस्ट, २०२१ व मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक पत्र क्रमांक टिओडी ११२०२०/ताडी धोरण /११/अकरा, मुंबई, दि.०१ स्पटेंबर २०२१ अन्वये आदेश पारीत केले आहेत. सदर आदेशाच्या तरतुदीनुसार जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील ताडी वर्षे सन २०२४-२५ या कालावधीसाठी ताडी विकण्याची दुकाने चालविण्याच्या एकूण -०९ ताडी अनुज्ञप्त्या देण्यासाठी जाहिर ई-लिलाव नि-ई निविदा खालील प्रमाणे www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर घेण्यात येणार आहे.

लिलाव – नि-निविदाच्या (ई-लिलाव) काही महत्वाच्या नियम व अटी खालील प्रमाणे आहेत.

१. महाराष्ट्र ताडी दुकानांबाबत (जाहिर लिलाव -नि-निविदेव्दारे अनुज्ञप्ती) (ई-लिलाव) मंजूर करण्याचे आदेश १९६८ व सुधारित आदेशामधील सर्व तरतुदी बोली बोलणान्यावर ई-लिलाव नि-निविदाव्दारे भरणे बंधनकारक राहतील, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर ई-लिलावात बोली आल्यानंतर आणि ई-निविदा विचारात घेऊन अनुज्ञप्ती मंजूरीबाबत निर्णय घेतील.

२. सर्व पात्र / इच्छुक इसमानी ई-लिलाव-नि-निविदा प्रक्रियेत भाग घेण्याकरिता http: Mahatenders.gov.in या संकेतस्थळावर enroll करणे आवश्यक आहे.

३. सर्व पात्र ईच्छुक इसमांनी ई-लिलाव-नि-निविदा प्रक्रिया भाग घेण्याकरिता स्वतःचे DSC(Digital Signature Certificate) असणे आवश्यक आहे.

४. ई-लिलाव -नि-निविदा संदर्भात कागदपत्रे Online सादर करणे आवश्यक आहे.

५. कोणत्याही परिस्थितीत उपरोक्त नमुद वेळेनंतर निविदा स्विकारल्या जाणार नाहीत तसेच निविदा फक्त Online पध्दतीने सादर करणे आवश्यक आहे. इतर पध्दतीने निविदा स्विकारली जाणार नाही.

६. Online पध्दतीने निविदा सादर करताना Technical documents असे लिहलेल्या Option वर क्लिक करुन सर्व कागदपत्रे सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे PDF Format तांत्रिक लिफाफ्यामध्ये Uplod करावे तसेच तात्रिक लिफाफ्यामध्ये सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी सोबत जोडली आहे.

. Work Item Documents मध्ये उपलब्ध असलेली वि.ओ. क्यु (B.O.Q. excel sheet) डाउनलोड करुन घ्यावी बि.ओ. क्यु (B.O.Q.) मध्ये Name of the bidder/ Name of the bidder Company cka नमुद केलेल्या रकान्यात स्वतःचे / कंपनीचे नाव नोंदवावे. ज्या दुकानासाठी निविदा भरावयाची आहे त्या दुकानाच्या समोर बिड रक्कम भरण्यासाठी दिलेल्या रकान्यात बिड रक्कम भरावी. स्वतःचे / कंपनीचे नाव व बिड रक्कम भरल्यानंतर बि.ओ.क्यु (B.O.Q.) आर्थिक लिफाफ्यामध्ये अपलोड करावी.

८. ज्या व्यक्तीने ई-निविदा भरलेली आहे फक्त अशाचे व्यक्तीस ई-लिलावात भाग घेता येईल ज्या व्यक्तीने ई-निविदा भरलेली नाही अशा व्यक्तीस ई-लिलावात भाग घेता येणार नाही. व निविदेच्या रकमेच्या (वि.ओ.क्यु. मध्ये बिडर ने भरलेल्या रकमेच्या) १/१० इतकी इसारा रक्कम दिनांक २१/१०/२०२४ रोजी सायंकाळी १७.०० वाजेपर्यंत अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कार्यालयात जमा करावी लागेल. सदर रक्कम मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेतून काढलेल्या डिमांड ड्राफ्ट या स्वरुपात राहील. निविदेच्या मोहोर बंद लिफाप्यावर दुकानाचे नाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर सन दिनांक ०१/०९/२०२४ ते दिनांक ३१/०८/२०२५ या कालावधीसाठी किरकोळ ताडी विक्रीसाठी देण्यात येणारी दुकाने करीता मोहोर बंद निविदा असे नमुद करावे.

९. पुढील कारणास्तव निविदा अपात्र ठरविण्यात येतील.

अ) सशर्त निविदा असल्यास.

ब) निविदे सोबतची इसारा रक्कम निविदा रक्कमेच्या १/१० पेक्षा कमी असल्यास. 

क) इसारा रक्कम अनुसूचित बँकेतून काढलेल्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात नसल्यास.

ड) इसारा रक्कम धनादेशाव्दारे (चेकने) देण्यात आल्यास.

इ) निविदा नमुन्यातील माहिती अपूर्ण असल्यास, उदा. निविदेची रक्कम लिहीलेली नसल्यास

ई) निविदाधारक / अर्जदार बोलीधारक (Bidder) हा महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबत संबंधित सक्षमप्रा धिकारी यांचे प्रमाणपत्र वा तत्सम बाबी नसल्यास,

उ) आवश्यक कागदपत्रे अपलोड व सादर केले नसल्यास.

१०. ज्या व्यक्तीने ई-निविदा भरलेली आहे फक्त अशाच व्यक्तीस ई-लिलावात भाग घेता येईल. ज्या व्यक्तीने ई निविदा भरलेली नाही अशा व्यक्तीस ई-लिलावात भाग घेता येणार नाही.

११. यशस्वी बोलीधारक इसार रक्कम बोलीच्या रक्कमेत समायोजित करण्यात येतील. यशस्वी बोलीधारक व्यतिरिक्त इतर व्यक्तिना लिलाव संपल्यानंतर सदरची रक्कम परत केली जाईल. मात्र त्याकरिता त्यास इसारा पावती लिलाव प्राधिकाऱ्याकडे परत करावे लागेल.

१२. लिलाव प्राधिकारी कोणत्याही इसमास त्यांचे नांवे देशी दारु किरकोळ विक्री परवाना असल्यास अथवा सरकारी थकबाकी आहे या मुद्यावर बोली नाकारु शकेल.

१३. जर एखादी व्यक्ती मुंबई दारुबंदी कायदा १९४९ खाली एखाद्या अपराधारासाठी किंवा दखलपात्र आणि अजामीनपात्र अपराधासाठी किंवा औषधी द्रव्ये व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९५५ किंवा मुंबई औषधी द्रव्ये (नियंत्रण) अधिनियम – १९५९ किंवा ट्रेड अॅण्ड मर्कण्डाईज माक्स अधिनियम १९५८ या खाली किंवा सिमा शुल्क अधिनियम – १९६२ च्या प्रकरण १४ खालील अपराधासाठी शिक्षापात्र असेल तर लिलाव प्राधिकारी अशा व्यक्तीने भरलेली ई-निविदा स्विकारणार नाही. व कोणत्याही व्यक्तीस जो पर्यंत ती दुसऱ्या व्यक्तीकडून यथोचीतरित्या दिलेल्या मुखत्यारनामा आणि संस्थेच्या व्यक्तीस जो पर्यंत ती संस्थेच्या व्यवस्थापकीय समीतीचे प्राधीकार पत्र धारणकरत नाही तो पर्यंत एखाद्या व्यक्तीच्या वतीने किंवा संस्थेच्या वतीने ई- लिलावास भाग घेण्यास मुभा देता येणार नाही.

१४. जी व्यक्ती लिलाव प्राधिकाऱ्याच्या मते सट्टेगिरी किंवा विशिष्ट हेतूने बोली बोलत आहे असे निर्देशनास आल्यास अशा व्यक्तीस बोलण्यास अपात्र ठरविण्यात येईल. तसेच बोली स्विकारतांना खुली किंवा गुप्त एकाधिकारशाही निर्माण होत आहे असे निर्देशनास आल्यास अशा इसमास अथवा गटास लिलाव प्राधिकारीबोली बोलण्यास मज्जाव करून शकतील.

१५. सदर लिलाव हे उपरोक्त नमुद आदेशांच्या तरतुदीनुसार होणार आहेत व ह्या लिलावांत भाग घेणाच्याबोली धारकावर व निविदाकारावर सदर आदेशाच्या तरतुदीचे पालन करणे बंधनकारक आहे.

१६. बोली व निविदा यांच्या तुलनात्मक विचार करून राज्याच्या महसुलाच्या हिताच्या दृष्टिने विचार करून योग्य तो निर्णय लिलाव प्राधिकारी घेतील. व दोन किंवा अधीक व्यक्तीना भागीदारी नमुना ट- इ-१ अनुज्ञप्ती धारन करावयाची असल्यास ई लिलावात भागघेण्यापुर्वी त्यानी ई- लिलाव प्राधीकारी यांच्याकडे आपली भागीदारी जाहीर केली पाहीजे तसेच ई लिलावामध्ये अनुज्ञप्ती मिळालीतर अनुज्ञप्ती मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत भागीदारीचा नोंदणीकृत भागीदारी विलेख ई लिलाव प्राधीकाऱ्याकडे दाखल करणे अनिवार्य आहे.

१७. लिलावामध्ये एकदा एखादी बोली अंतिमतः स्विकारण्यात आल्यानंतर व त्याच दुकानासाठी स्विकारण्यात आलेली निविदा उघडल्यानंतर त्या व्यवहाराबाबत नंतर कोणताही देकार विचारात घेण्यात येणार नाहीत. लिलाव प्राधिकारी याबाबत कोणतीही वाटाघाटी करणार नाही आणि एकदा अंतिम केलेल्या लिलावर लिलाव प्राधिकान्याकडून फेरविचार केला जाणार नाही.

१८. अयशस्वी निविदाकारास इसारा रक्कम त्यास परत करण्यात येईल.

१९. प्रत्येक लिलाव खरेदीदार त्याला दिलेल्या अनुज्ञप्तीच्या आणि या संदर्भात केलेल्या नियमांमध्ये तरतुद केल्याप्रमाणे त्याने करून द्यावयाच्या प्रतीरुप कराराच्या अटीचे व शर्तीचे योग्य रितीने पालन होण्यासाठी अनुज्ञप्ती कालावधी सुरु होण्यापूर्वी एक महिना हप्त्यांच्या रक्कमे एवढी प्रतिभूती घेवून (अनामत रक्कम) शासकिय कोषागारात भरावा लागेल व राहिलेली रक्कम समान चार मासिक हत्यांमध्ये भरावयाची आहे.

२०. लिलाव खरेदीदाराने उपरोक्त अट क्र. १७ मध्ये नमुद केल्याप्रमाणे १/४ व १/६ रक्कम व माहे आक्टोंबर २०२२ च्या हप्त्याची रक्कम भरण्यात कसूर केली तर मा. जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर स्विकारलेली बोली रद्द करून आणि त्या खालोखालची सर्वोच्च बोली स्विकारू शकतील किंवा त्या दुकानाचा लिलाव करु शकतील आणि अशावेळी लिलाव खरेदी दाराने भरलेली इसारा रक्कम राज्य शासनाकडे समपहरण करण्यात येईल. तसेच राज्य शासनाला त्या खालोखालची सर्वोच्च बोली स्विकारण्यामध्ये अथवा लिलाव मिळालेल्या बोलीच्या रक्कममेमध्ये झालेल्या हानीस तो कसूरदार लिलाव खरेदीदार जबाबदार असेल. नंतरच्या लिलावामध्ये मिळालेली रक्कम पहिल्या लिलावामध्ये मिळालेल्या रक्कमेपेक्षा कमी असल्यास किंवा जर पहिल्या लिलावामध्ये नंतरच्या खालोखालच्या बोलीदाराची रक्कम स्विकारण्यात आली असेल तर अशा फरकाची रक्कम कसुरदाराकडून प्रदान करण्यात आली नसल्यास तो जमिन महसुलाची थकबाकी प्रमाणे त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल.

२१. राहिलेल्या शिल्लक रक्कम हप्त्याने प्रत्येक महिन्याच्या ५ तारिख पर्यंत किंवा ५ तारखेपूर्वी न भरल्यास त्यावर द.सा.द.शे. २४ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल जर हप्त्याची रक्कम महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत व्याजासह जमा न केल्यास त्या ताड़ी दुकानाचा परवानाधारकाच्या स्वखर्चाने फेर लिलाव करण्यात येईल व दुसन्या लिलावात वसूल झालेली रक्कम ही पहिल्या लिलावाच्या रक्कममेपेक्षा कमी असल्यास फरकाची रक्कम पहिल्या परवानाधारकाकडून वसूल करण्यात येईल.

२२. लिलाव-नि-निविदेद्वारे जी बोली स्वीकारण्यात आली आहे अशा व्यक्तीने अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,छत्रपती संभाजीनगर यांच्या समक्ष १ प्रतिरूप करार लिलाव झाल्यापासून १५ दिवसांचे आत न चुकता पूर्ण केला पाहीजे.

२३. कोणत्याही कारणामुळे यशस्वी बोलीधारकाला झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळणार नाही.

२४. यशस्वी बोली बोलणाऱ्याला पूर्णपणे आपल्या करारास अनुसरुन वागावे लागेल. तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने (लिलाव-नि-निविदाव्दारे लायसन्स देणे) आदेश २००१ व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती देणे) व ताडीची झाडे (छेदणे) नियम १९६८ च्या तरतुदी, नियम व अटी बंधनकारक राहतील. २५. ज्या व्यक्तीच्या नांवे लिलावात ताडी दुकान मंजूर करण्यात येईल अशा व्यक्तीस अन्न व भेसळ प्रतिबंधक कायम १९५५ नुसार ताडी विक्री करण्यासाठी उचित अनुज्ञप्ती घेणे आवश्यक आहे. २६. टी. डी-१ अनुज्ञप्तीधारकाला नमुना सीएल/एफएल/टीओडी-३ ही अनुज्ञप्ती ताडी दुकानात देशी दारु सिलबंद बाटल्या विकण्यासाठी मिळणार नाही.

२७. ई लिलाव-नि- ई निविदा पध्दतीने ताडी दुकाने घेतेलेल्या बोलीधारकांना टी. डी. १ अनुज्ञप्ती मंजूर करण्यासाठी अर्जामध्ये ताडी दुकान प्रस्थापित करणार त्या जागेची चतुः सिमा नमुद करावी.

२८. यशस्वी बोली बोलणारा व्यक्ती ताडी दुकाना करिता जागा मिळविण्यास जबाबदार राहील ताडी विक्री नमुना टी. डी. १ चालु करण्याकरिता जागेबाबत पुढील शर्तीची पुर्तता करणे आवश्यक राहील.

A. ताडी दुकानाच्या जागेचे क्षेत्रफळ ९ चौरस मीटर पेक्षा कमी असता कामा नये तसेच ताडी दुकानात ताड़ी पिणारे व्यक्ती ताड़ी पितांना बाहेरील लोकांच्या दृष्टिस पडणार नाही अशी व्यवस्था केली पाहीजे.

B. ताडी दुकानाच्या जागेचे अंतर शैक्षणिक किंवा धार्मिक संस्थेपासून अ व ब नगरपरिषद हद्दीत किमान ५०मीटर तर इतर ठिकाणी किमान १०० मीटर दूर असले पाहिजे.

C. ताडी दुकानाच्या जागेचे अंतर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कुठल्याही स्टैंड, स्टेशन किंवा डेपो पासून किमान १०० मीटर दूर असले पाहिजे.

D. ताडी दुकानाच्या जागा जिल्हाधिकारी अगर त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या मते ताडी विक्रीकरिता योग्य असली पाहिजे. (नोंदणीकृत अनुसुचित शैक्षणिक संस्था, नोंदणीकृत धार्मिक संस्था मंदिरे, मस्जिद, चर्चइत्यादी) या पासून अंतरनिबंधमुक्त असावे.

E. राष्ट्रीय व्यक्तीमत्वाचे पुतळे यापासून अंतरनिबंधमुक्त असावे.

२९. प्रत्येक टी. डी. १ अनुज्ञप्तीधारकाला त्याच्या दुकानात काम करणाऱ्या व बनात काम करणाऱ्या नोकरांचा विहित शुल्क भरून नोकरनामा काढणे आवश्यक आहे.

 

३०. टी. डी. ५ छेदने परमिट मिळाल्याशिवाय झाडे छेदणारा व टी.डी. १ अनुज्ञप्ती मिळाल्याशिवाय दुकान चालवणाऱ्या इसमाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

३१. ताडी झाडे मिळवण्याची पुर्ण जबाबदारी अनुज्ञप्तीधारकावर राहील. महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक टी.ओ.डी. १२९६-२६ (२)-इ-एक्स-सी-३ दि०८/०५/१९९५ नुसार वृक्षकर माफ करण्यात आला आहे.

३२. थकबाकीदाराच्या अनुज्ञप्त्या निलंबित अगर रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. अनुज्ञप्तीधारकाकडे एकापेक्षा अधिक अनुज्ञप्त्या असतील तर त्या थकबाकी वसुलीची तसेच इतर अबकारी अनुज्ञप्त्या निलंबित किंवा रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत.

३३. जे नियम सध्या लागू आहेत व पुढील जे नियम किंवा आदेश वेळोवेळी अंमलात येतील ते टी.डी.१ अनुज्ञप्तीधारकांना बंधनकार राहतील.

३४. ई-लिलावामध्ये एखादी बोली अंतिमतः स्विकारण्यांत आल्यावर त्या व्यवहाराबाबत त्यांनतर कोणताही अथवा कोणतेही देकार विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच कोणत्याही वाटाघाटी करण्यांत येणार नाहीत. एकदा अंतिम केलेल्या लिलावावर फेर विचार केला जाणार नाही.

३५. ताडी दुकानांच्या जागे संदर्भात कोणतेही वाद किंवा तक्रार असल्यास यशस्वी बोलीधारक जबाबदार राहील.

३६. थकबाकीदारांना लिलावात भाग घेता येणार नाही व मासिक ताडी विक्रीचे विवरणपत्र सादर करताना त्या महीन्यातील ताडीची दररोजची विक्री किंती झाली तसेच त्या अनुषंगाने छेदण्यात आलेली ताडीची झाडे याबाबतची माहीती दर महीन्याच्या पाच तारखेपूर्वी सादर करणे बंधनकारक राहील.

३७. ज्या तालुक्यात ताडी दुकान (अनुज्ञप्ती) मंजूर आहे ते मंजूर दुकान (अनुज्ञप्ती) त्या तालुक्यातून इतरत्र व मंजूर कार्यक्षेत्रा बाहेर हलविता येणार नाही.

३८. भेसळयुक्त ताडी विक्रि / अवैध ताडी विक्रि झाल्यास संबंधीत अनुज्ञप्तीधारकावर मुंबई दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. व ताडी अनुज्ञप्ती घेण्यापूर्वी अनुज्ञप्तीधाराने १) शुध्द ताडी विक्री करण्यात येईल, २) ताडी मध्ये साखर किंवा सॅकरीनसारखे किंवा क्लोरल हाईड्रेड इत्यादी मिश्रीत करुन ताडी विक्री केली जाणार नाही. ताडी मध्ये साखर किंवा सॅकरीनसारखे किंवा क्लोरल हाईड्रेड इत्यादी मिश्रीत भेसळ केल्याचे आढळुन आल्यास भारतीय दंड विधान संहितेच्या कलम २७२ ते अंतर्गत मी कारवाईस पात्र राहील व ३२८ डायझेमपॅन सारखे नारकोटीक्स सारखे पदार्थ ताडीमध्ये आढळल्यास NDPS कायदयातील कलम ८ व (सी) प्रमाणे कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे रु.१००/- च्या बॉण्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र करुन देणे / बंधनकारक राहील.

३९. ई-लिलावात बोली बोलणारी व्यक्ति अथवा निविदेत देकार देणारी व्यक्ति यांनी सादर केलेले पतदारी प्रमाणपत्र हे त्यांच्या स्वतःच्याच मालमत्तेच्या आधारे असणे आवश्यक आहे. जर त्या व्यक्तिने दुसया व्यक्तिच्या मालमत्तेच्या आधारे पतदारी प्रमाणपत्र सादर केले असेल तर ती दुसरी व्यक्तिही बोलीदाराच्या व्यवहारात भागीदार असणे आवश्यक आहे.

४०. जर एखादी व्यक्ति महाराष्ट्र देशी दारु नियम १९७३ च्या नियम २४ प्रमाणे सीएल-३ लायसन धारण करणारी असेल तर लिलाव प्राधिकारी त्यांची बोली किंवा निविदा फेटाळतील.

४१. ज्या मालमत्तेच्या आधारे ऐपतदार प्रमाणपत्र सादर केले असेल त्या मालमत्तेच्या आधारे सरकारी कार्यालयातील नोंदीवर इत्तर हक्क जिल्हाधिकारी किंवा अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांची नांवे फक्त नोंदणी रकान्यात नोंदवावी लागतील. अशी नोंदणी झाल्यावर यशस्वी बोली बोलणायास टी.डी. १. अनुज्ञप्ती मंजूर करण्यात येईल. मालमत्तेच्या कागदपत्राची नोंद करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी यशस्वी बोलीधारकांची राहील.

४२. एखाद्या लायसन्स धारकाने त्यांच्या लायसन्स मिळालेल्या दुकानाची बोलीची संपूर्ण रक्कम भरली असेल पण त्यांने आपल्या परिसरातील आपले ताडी दुकान कोणत्याही कारणास्तव बंद ठेवले असेल किंवा कोणत्याही परिसरातील लायसंस मिळालेली ताडी दुकाने जिल्हाधिकारी यांचे समाधान होईल अशा प्रकारे चालवले नाही तर जिल्हाधिकारी ताडी वर्षामध्ये त्या परिसरामध्ये अतिरिक्त ताडी दुकान किंवा दुकाने मंजूर करु शकतील आणि अशा दुकानाचा किंवा दुकानांचा लिलाव करु शकतील.

४३. लिलाव खरेदी दारासाठी असलेले लायसन्स ताडी वर्षांच्या ०१ ऑक्टोंबर, २०२४ पासून अमलात येईल. लायसन्स मिळण्यासाठी देऊ केलेली बोली ही ताडी वर्षाच्या काही भागासाठी नसून ती ताडी वर्षाच्या कालावधीसाठी असेल. लायसन्सच्या कालावधीत जर फेर लिलाव असेल तर देऊ केलेल्या बोली जिल्हाधिकायाकडून अधिसूचित केलेल्या कालावधीसाठी असतील. जो कालावधी लिलावाच्या दिनांका नंतरच्या पुढील ३१ ऑगस्ट २०२५ च्या नंतरचा नसेल.

४४. अनुज्ञप्तीच्या मुदतीत जनहिताच्या दृष्टिने विक्रीच्या वेळात बदल करणे, किंवा दुकान बंद ठेवण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना राहील.

४५. अनुज्ञप्ती धारकाने त्यांनी घेतलेल्या ताडी दुकानाची किंमत वसूल होईल इतकी ताडी किंवा शिदीची झाडे वर्षभरात घ्यावीत व त्यापासुन काढलेली शुध्द ताडी दुकानातील गि-हाईकांना पिण्यास मिळेल याची काळजी घ्यावी लागेल. दुकानात ताडी खेरीज इतर मादक पदार्थ क्लोरल हैड्रेट मिश्रीत ताडी व दारू विक्री केल्यास ताडी अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. व लायसन रदद होण्यास पात्र ठरेल.

४६. अनुज्ञप्तीधारकास सकाळी ०७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत ताडी विक्री करता येईल. तसेच गिहाईकास एकावेळी ३ लिटर ताडी दुकानाबाहेर नेण्यास सवलत राहील. ताडी वाहतूक / आयात/विक्रीबाबत सर्व नोंदवहया अद्ययावत ठेवाव्या लागतील.

४७. शासनाने महत्त्वाच्या दिवशी जाहीर केल्याप्रमाणे किवा सक्षम अधिका-यांने आदेशीत केलेल्या दिवशी ताडी दुकाने बंद ठेवावी लागतील. याबाबतीत कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही.

४८. प्रत्येक अनुज्ञप्तीधारकावर राज्य शासनाने तसेच आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजीनगर यांनी वेळोवेळी दिलेले आदेश, सूचना, मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे बंधनकारक राहील.

४९. ताडी लिलाव झाल्यानंतर प्रत्येक अनुज्ञप्तीधारकाकडे असलेल्या झाडांची संख्या बदल नोंद अनुज्ञप्तीवर करण्यात येईल.

५०. ताडी अनुज्ञप्ती मंजुरी व नुतनीकरण करण्याकरिता २ वर्षाचा एकत्रित कालावधी निश्चित करुन या २ वर्षाच्या कालावधीसाठी लिलाव नि निविदा आणि नुतनीकरण या पध्दतीचा अवलंब करावा, म्हणजेच, सन २०२४-२०२५ या प्रथम वर्षी लिलाव नि निविदा या पध्दतीचा अवलंब करुन २ वर्षाच्या कालावधीसाठी ताडी विक्री अनुज्ञप्ती मंजूर कराव्यात. तदनंतर त्यापुढील १ वर्षे, दरवर्षी गतवर्षीच्या दुकानाच्या किमतीमध्ये ६% वाढ करुन नुतनीकरण करण्यात यावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत २ वर्षाचा एकत्रित कालावधी संपल्यानंतर पुढील वर्षी नव्याने लिलाव – नि – निविदा या पध्दतीने अनुज्ञप्त्या मंजूर करुन त्या अनुज्ञप्त्याचे त्यापुढील ४ वर्षासाठी दुकानाच्या किमतीमध्ये ६% वाढ करुन नुतनीकरणे करण्यात यावे या पध्दतीला लिलाव नि निविदा आणि नुतनीकरण असे संबोधण्यात येत असले तरी या पध्दतीचा एकत्रित कालावधी ५ वर्षाचा असेल. त्यानुसार सन- २०२६-२०२७ या वर्षी नव्याने लिलाव नि निविदा पध्दत अनुसरुन अनुज्ञप्त्या मंजूर कराव्यात व या अनुज्ञप्त्यांचे दुकानाच्या किमती मध्ये ६% वाढ करुन त्यापुढील ४ वर्षे नुतनीकरण करण्यात यावे. तशीच पध्दत पुढील कालावधीसाठी चालू राहील.

५१. टीडी-१ अनुज्ञप्ती मंजूर झाल्यानंतर संबंधितांना अन्न व औषध प्रशासनाकडून FSSAI अंतर्गत नोंदणी करणे/अनुज्ञप्ती घेणे बांधनकारक राहील.

५२. सदर ताडी दुकानांसाठी रु. १० लाख या महत्तम मर्यादित लिलाव- नि- निविदा राबविण्यात येणार असल्याने लिलाव- नि- निविदा पध्दती मध्ये उच्चतम बोली / निविदा रक्कम समान आल्यास अशा लॉटरी पध्दतीचा अवलंब करण्यात येईल.

५३ (अ) कोणत्याही अटीच्या अर्थाबद्दल किंवा इतर कोणत्याही बाबतीत विवाद उद्भवल्यास मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचा निर्णय अंतीम व बंधनकारक राहील.

(ब) आवश्यक वाटल्यास ताडी दुकान रद्द करणे अथवा उपरोक्त अटी शर्ती मध्ये पुर्व सुचना न देता रद्द करण्याचा/राखून ठेवण्याचा तसेच सुधारणा करण्याचा हक्क मा. जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी राखून ठेवला आहे.

(क) वरील पैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग केल्यास अनामत रक्कम व लिलावधारकाने शासनास अदा केलेली सर्व रक्कम जप्त करून लिलाव रद्द करण्यात येईल तसेच आवश्यकतेनुसार इतरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

(ड) जाहिर नोटीसी मध्ये दिलेल्या अटीमध्ये आयत्या वेळी बदल करण्याचा अधिकार मा. जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे.

 

मा. जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने दि.१९.०९.२०२४

वरील सर्व माहिती मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर यांचे संकेत स्थळावर उपलब्ध असून आम्ही सदर या वेबसाईट वरून फक्त माहिती जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोच करण्याच्या उद्देशाने प्रसारित केलेली आहे. त्यामुळे याबद्दल अर्ज करताना आणि आर्थिक व्यवहार करताना सबंधित अधिकारी कार्यालयातून अधिकृत माहिती घेऊनच योग्य ती पाऊले उचलावीत

संपूर्ण अर्ज आणि आधिकृत माहिती पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राममुळे चॅनल ला भेट द्या.

Leave a Comment