भारतातील जुना कायदा रद्द , आता आले नवीन कायदे
भारत देशातील कायदे फार जुने झाले , त्यात काळानुसार बदल झाले पाहिजेत असे अनेक वर्षांपासून भारतीय जनतेची ओरड होती. 1860 मध्ये तयार करण्यात आलेला कायदा , त्यावेळची गुन्हेगारी परिस्थिती , तपास यंत्रणा आणि आताचे आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक बदललेले राष्ट्र यामुळे पूर्वीच्या कायदे तरतुदी कालबाह्य झाल्या आहेत असे अनेकांचे मत होते. बदललेले तंत्रज्ञान आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यावर अभ्यास करून आता नवीन कायदे अमलात आणले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 बजावणी होईल.तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हा नवीन कायदा असेल आणि भारतीय पुरावा कायदा 1872 ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 याप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. या तीनही कायदे बाबत भारत सरकारने अधिसूचना जारी केलेली असून 2024 च्या 1 जुलै पासून हा नवीन कायदा संपूर्ण भारत देशात अमलात आणला आहे.
भारतीय न्याय संहिता 2023,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तिन्ही नवीन कायद्यामुळे संपूर्ण देशात कार्य प्रणाली बदलणार आहे. कुठलाही वाद झाल्या नंतर पोलिस स्टेशन ला प्रथम तक्रार म्हणजेच F.I.R. पासून तपास यंत्रणा आणि न्यायालयात न्याय यंत्रणा पद्धती यामध्ये बऱ्याच प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. आता गुन्हे बाबत ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुद्धा सुविधा सुरू करण्यात आली आहेत त्याच बरोबर सोशिअल मीडिया माध्यमातील रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ यांना सुद्धा पुराव्याचे साधन म्हणून महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. या नवीन कायदे अंतर्गत महिला आणि बाल सुरक्षा बाबतीत गांभीर्यपूर्वक काळजी घेतली आहे. महिला आणि मुलींना फसवून शोषण करणे, रस्त्याने अपघात झाल्या नंतर तसेच वाहन पळवून घेऊन जाणे याला गंभीर गुन्हा समजून कठोर शासन करण्याची तरतूद केली आहे. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणे यावर सुद्धा गांभीर्याने पाहिले आहे. नवीन कायद्यामुळे नक्कीच लोकांना लवकर न्याय मिळेल याची सर्वांना आशा आहे.