जिल्हा परिषद बीड भरती संदर्भात म्हत्वाची सूचना, वाचून यादीत नाव पहा
जिल्हा परिषद बीड भरती बाबत म्हत्वाची सूचना प्रकाशित करण्यात आलेली आहेत. सर्वांनी काळजी पूर्वक सूचना नोटीस वाचून यादीमध्ये आपले नाव आहे का तपासावे.
विषय :- जिल्हा परिषद, बीड अंतर्गत गट – क संवर्गातील पदभरती बाबत..
संदर्भ :- या कार्यालयाचे पत्र क्र. जिपबी/साप्रवि/७पं१अ/कावि-५६२/३३६१/२०२४ दिनांक १२/०८/२०२४
शासनाकडील सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्रं. प्रनिमं१२२२/प्रक्र५४/का.१३-अ दिनांक ४ मे २०२२, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र.संकिर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था-८ दिनांक १० मे २०२२, वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.प.द.नि.-२०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क. दि. ३० सप्टेंबर २०२२, ग्राम विकास विभागाचे शा.नि. क्र. संकीर्ण -२०२२/प्रक्र११/आस्था-८ दि.२०/१०/२०२२, वित्त विभागाचे शासन निर्णय प.द.नि.- २०२२/प्रक्र.२०/२०२२आ.प.क. दि.३१/१०/२०२२, ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय क्र.२०२२/प्रक्र.११/आस्था- ८दि.१५/११/२०२२, साप्रविचेशा.नि. क्र.प्रानिमं१२२२/प्रक्र१३६/का-१३ ब दि. २१/११/२०२२ अन्वये विहित तरतुदी आणि निर्देशनुसार जि. प. बीड अंतर्गत गट क मधील कंत्राटी ग्रामसेवक संवर्गाचे सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात देवून ऑनलाईन पध्दतीने आयबीपीएस कंपणी मार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. त्यानुसार या कार्यालयाचे संदर्भिय पत्रान्वये उमेदवारांची अंतिम निवड करणेसाठी आपणास आपले मुळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र पडताळणी करीता दिनांक २०/०८/२०२४ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता जि.प.बीड येथे बोलाविण्यात आलेले होते. सदरील बाब ही त्याच दिवशी जि.प.चे संकेत स्थळावर प्रसिध्द करून आपणास वैयक्तीकरित्या पोस्टाने कळविलेले आहे. तरी देखील आपण सदरच्या पडताळणीसाठी जि. प. बीड येथे उपस्थित झालेले नाहीत. एक शेवटी संधी म्हणून आपणा परत एकदा सदरच्या पडताळणीसाठी याव्दारे बोलावण्यात येत आहे. तरी आपले मुळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र पडताळणी करीता आपण स्वतः दिनांक ०३/०९/२०२४ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता जि.प. सभागृह, नविन प्रशासकिय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ, बशीरगंज, बीड येथे आपले सर्व मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे. तपाणीसाठी वेळेवर उपस्थित न राहील्यास आपणास सेवेची आवश्यकता नाही असे गृहित धरून आपले नांव अंतिम निवड याद्यीमधून वगळण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी.
वरील प्रमाणे नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे.