sdm madam anti curruption beed: उप विभागीय अधिकारी कार्यालय बीड मधील अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडला
*आदरणीय सर,
यशस्वी सापळा कारवाई अहवाल*
दि.27/09/2024
▶️ युनिट- छत्रपती संभाजीनगर
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 50 वर्ष,रा. ता.गेवराई , जिल्हा बीड,
▶️ आलोसे – निलेश धर्मदास मेश्राम, वय 31 वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी- सजा (मांजरसुंबा ) प्रतिनियुक्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय, बीड उपविभाग, ता,जि, बीड
➡️लाच मागणी दिनांक –
27/09/2024
▶️ लाच मागणी रक्कम
7000/-रु
➡️ लाच स्विकारली दि
27/09/2024
➡️ लाच स्विकारली रक्कम
7000/-रुपये
▶️ ठिकाण कौटुंबिक न्यायालय, जुनी इमारत उपविभागीय अधिकारी कार्यालय रूम क्रमांक(109 )
▶️ कारण – तक्रारदार यांचे गेवराई हद्दीत राक्षसभुवन रोड वर जय हिंद नावाचे हॉटेल असून सदर हॉटेल वर दारूबंदी विभागाकडून व गेवराई पोलीस ठाण्याकडून मुं .दा.का 65 (ई) प्रमाणे दोन गुन्हे दाखल होते, त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी त्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथून मु. दा.का. कलम 93 (ब) प्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी नोटीस
बजावण्यात आली होती.
त्या नोटीसच्या अनुषंगाने बंधपत्र लिहून घेण्यासाठी व सदर प्रकरण बंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे आलोसे यांनी स्वतःसाठी 2000 /हजार रुपये व उप विभागीय दंडाधिकारी मॅडम यांच्यासाठी 5000/ हजार रुपये अशी एकूण 7000/ हजार रुपये लाचेची मागणी पंच साक्षीदार समक्ष करून सदर लाचेची रक्कम स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली आहे. आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असून पोस्टे बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️ सापळा अधिकारी
हरीदास डोळे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर
मोबा. 9922434598
▶️ सहायक सापळा अधिकारी वाल्मीक कोरे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर मोबा.9623565310
▶️मार्गदर्शक- संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.
9923023361
श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर
मो. न. 9881460103
श्री सुरेश नाईकनवरे पोलीस उपाधीक्षक छत्रपती संभाजीनगर मो न ,9923247986
➡️सापळा पथक – पोलीस हवालदार साईनाथ तोडकर, पोअं, राजेंद्र नंदिले , चालक सी. एन. बागुल ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर,
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य कोणीही
लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064
पोलीस अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर :-9923023361