ग्रामीण भागात पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी अर्ज करा
दुष्काळी भागात पाणी वाटप करण्यासाठी , खाजगी टँकर ने पाणी पुरवठा करण्यासाठी सरकार च्या वतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
संदर्भ:-या कार्यालयाची ई-निविदा सूचना जा.क्र.2024/महसूलविभाग2/SCYWSपाणीटंचाई 10/4/ई- निविदा-2024-25 दि. 07/08/2024
उपरोक्त संदर्भान्वये सन 2024-25 (दि.01/07/2024 ते दि.30/06/2025 या कालावधीसाठी) पाणी टंचाई निवारणार्थ टंचाईग्रस्त ग्रामीण भागात खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी फेर- ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्याद्वारे शासनाचे www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावरुन ई-निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. ई-निविदा भरणेचा अंतीम दिनांक 30/08/2024 व निविदा उघडण्याचा दिनांक 03/09/2024 रोजी दुपारी 03:00 वा. निश्चित करणेत आलेला आहे.
तथापि, उपरोक्त ई-निविदा सूचनेस सदर कालावधीत प्रतिसाद न मिळाल्यामुळे ई-निविदा भरण्यासाठी प्रथग मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार ई-निविदा भरण्याचा सुधारित अंतिम दि. 06/09/2024 रोजी कार्यालयीन वेळे पर्यंत ठेवण्यात येत असून, ई-निविदा लिफाफा क्र.01 व लिफाफा क्र.02 उघडण्याचा दि. 09/09/2024 रोजी दुपारी 03.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे ठेवण्यात येत आहे. तरी सर्व निविदा धारकांनी दिनांक 09/09/2024 रोजी वरीलप्रमाणे निविदा उघडण्याच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे उपस्थित राहणे आवश्यक राहील याची नोंद घ्यावी.