बापो.. आता झाड तोडले तर डायरेक्ट 50 हजाराचा दंड
झाड तोडणारांनो आता तुमची काही खैर दिसत नाही कारण सरकार आता तुम्हाला तोडणार असे दिसतेय ते पण थोडे फार नाही तर थेट 50 हजार रुपये एक झाड तोडल्यास. नुकताच सरकार ने एक मोठा निर्णय घेतला असून झाडे तोडणाराच्या विरोधात कठोर निर्णय घेतलेला दिसतोय. दिवसेंदिवस वाढत चाललेली झाडांची कत्तल पाहून सरकार ला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाडांची कत्तल रोखण्यासाठी मोठा निर्णय झाला असून विना परवानगी झाडे तोडल्यास कठोर कार्यवाही केली जाणार आहे. अगोदर कोणी विना परवानगी झाडे तोडल्यास रुपये 1 हजाराचा दंड लावला जात होता.
विना परवानगी जंगल तोडणाऱ्यांसाठी वन विभागाने हे मोठे पाऊल उचलले असून या दंडाची तरतूद असणारा शासन निर्णय लवकरच मंजूर होणार आहे. सतत होत असलेली झाडांची कत्तल रोखण्यासाठी हे एक कठोर पाऊल सरकारच्या वतीने उचलण्यात आले आहे.