3 लाखाचे बक्षीस जिंका, तुळजा भवानी मंदिरासाठी आकर्षक लोगो बनवा आणि जिंका 3 लाख रुपये Tulja bhavani temple logo
श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे मंदिरासाठी नवीन लोगो तयार करायचा आहे यासाठी नव नवीन संकल्पना डोक्यात असलेल्या ग्राफिक डिझाईनर कडून लोगो तयार करून घ्यायचा आहे , त्यासाठी जो सर्वात सुंदर आकर्षक लोगो तयार करेल त्याला संस्थान च्या वतीने तब्बल 3 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरचा नव्याने लोगो तयार करणे आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ञ / जाणकार / स्वारस्य असणा-यांनी, लोगो तयार करण्यासंबंधीचे आकर्षक डिझाईनचे सादरीकरण श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कार्यालयात दिनांक 23/०९/२०२४ पर्यंत सादर करावे.
अ) श्री तुळजाभवानी मंदिराचा लोगो डिझाईन करणेबाबत.
१) लोगो हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा आहे हे सहजरित्या समजणे आवश्यक आहे.
२) लोगो आकर्षक असावा.
३) लोगोच्या रंगसंगतीमध्ये सुबकता असावी,
४) लोगो कमीत कमी जागेतही स्पष्ट व आकर्षक दिसावा.
५) लोगोत इतर कोणत्याही लोगोशी साधर्म्य व सुसंगत नसावा,
६) श्री तुळजाभवानी मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक, पारंपारीक रुढी, विधींचा अभ्यास करून लोगोचे आकर्षक असे डिझाईन सादर करावे.
ब) श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत.
१) उपरोक्त बाबीसाठी टेक्नॉलॉजीबाबत प्रस्ताव सादर करावेत.
अव बचे कामासाठी प्रोत्साहनपर बक्षिसे मंदिरमार्फत देण्यात येणार आहेत.
सर्वोत्कृष्ट बक्षीस – ०३ लाख असणार आहे.
इतर प्रोत्साहनपर बक्षीस दोन ०१ लाख प्रत्येकी असणार आहे.
उपरीक्त सर्व बाबी तसेच इतर अनुषंगीक बाबी लक्षात घेऊन आपले आकर्षक डिझाईनचे सादरीकरण करावे तसेच श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत टेक्नॉलॉजीबाबत सविस्तरपणे प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी इमेल आय. डी. shreetuljabhvanitemple@gmail.com वर संपर्क करावा.
संपर्कासाठी क्रमांक चव्हाण ए.बी. ९४०३३९६१३१